Sunday, 5 June 2016

माणसाची कविता

*"माणसाची कविता"*

मी *"छत्रपतींवर"* कविता लिहिली..
त्यांनी मला फोन करून विचारले,
*"तुम्ही मराठा आहे का?"*

मी *"बाबासाहेबांवर"* कविता लिहिली..
त्यांनी मला फोन करून विचारले,
*"तुम्ही बौध्द किंवा दलित आहे का?"*

मी *"फुल्यांवर"* कविता लिहिली..
त्यांनी मला फोन करून विचारले,
*"तुम्ही माळी आहे का?"*

*मी अहिल्या देवींवर कविता लिहीली...*
त्यांचा मला फोन आला
अन विचारले,
*"तुम्ही धनगर अहात का..?"*

*मी सावरकरांवर कविता लिहिली ...*
त्यांचा मला फोन आला
अन विचारले,
*"तुम्ही ब्राह्मण अहात का..?"*

मी *"माणसावर"* कविता लिहिली,
मला फोनच आला नाही...

वाट पाहतोय..

*माणसे गेली कुठे फ़क्त आणि फ़क्त जात राहिली आहे*

������

✍�� एक मनुष्य

No comments:

Post a Comment