Sunday, 27 March 2016

पुस्तक का वाचावे....?

पुस्तक का वाचावे....?




!! वाचेल तो वाचेल !!

1- महात्मा फुले हे मोठे क्रांतिकारक झाले याला कारणीभूत एकमेव गोष्ट  म्हणजे "थाॅमस पेन" यांनी लिहिलेले  "राईट्स ऑफ मॅन "नावाचे पुस्तक या पुस्तकातून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली. 

2 - डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न झाले याचे मूळ हे केळुसकर  गुरूजी यांनी बाबासाहेब यांना लहानपणीच भेट दिलेले बुद्ध चरित्र  हे पुस्तक आहे. 

3- भगतसिंग यांना इंग्रजानी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली सकाळी फाशी देणार तर आदल्या रात्री भगतसिंग हे एक पुस्तक वाचत होते त्या वेळी तेथील जेलरने भगतसिंग  यांना विचारले की "तुला तर उदया   फाशी देण्यात येणार आहे ; मग हया पुस्तक  वाचण्याचा काही उपयोग होणार नाही !! त्या वेळी भगतसिंग  जेलरला म्हणाले की "माझ्या  वाचनातून अनेक भगतसिंग जन्माला येतील ".

4- भगतसिंग यांनी तुरूंगात असताना पुस्तक वाचावयास मिळावे यासाठी अन्नत्याग करून उपोषण केले होते.

5 - वाचन हा शब्द  कसा तयार झाला?  

वचन- म्हणजे शपथ ;
एखादे काम पूर्ण करण्यासाठी किंवा  त्या मार्गावर चालण्यासाठी केलेला निर्धार शपथ चा अर्थ -
श- शतक ; 100 टक्के 
पथ- मार्ग  किंवा रस्ता 

म्हणजे शंभर टक्के यशाकडे जाणारा मार्ग होय.

वचन चा अर्थ  शपथ,
शपथ चा अर्थ यशस्वी मार्ग,
यावरून वाचन चा अर्थ हा शंभर टक्के यशस्वी मार्ग होय.

6 - बाबासाहेबानी पुस्तकासाठी राजगृह नावाचे एक घरच बांधले होते, ज्यात हजारो पुस्तक होती.

7 - अब्राहम लिंकन हा तर पुस्तकवेडा माणूस होता, एकदा तर शेजार्याकडून घेतलेले पुस्तक पावसात भिजल्याने त्या पुस्तकाची मजूरी म्हणून पुस्तक देणा-याकडे काम केले.

8 - नेपोलियन बोनापार्टने वाचलेल्या  पुस्तकाची यादी आजही पॅरिसमधील वस्तुसंग्रहालयात आहे.

9 - "अवंतिका" हे एक पुस्तक असून ते लिहणारी लेखिका तिचे नाव स्नेहलता दसनूरकर आहे, तिचे ते पुस्तक मिळवण्यासाठी नंबर लावावा लागतो.

10- मराठीतील पद्मा गोळे नावाची लेखिका होत्या त्यांचा मृत्यू काही मिनिटावर असताना त्यांना उठता, बसता येत नव्हते.
त्यामुळे त्या झोपून शेवटी पुस्तकाची एक एक पाने फाडून वाचत असत व पुस्तक वाचताना मरण पावल्या.

11 - आज भारतात सर्वात संपन्न जर कोणता धर्म असेल तर तो "शीख धर्म" आहे याचे कारण काय तर शीख  धर्माने ग्रंथाला गुरू मानून धर्मग्रंथाचा दर्जा दिला, तो "गुरूग्रंथसाहीब" हा धर्मग्रंथ आहे.

1 2 - लिंगायत धर्माचा धर्मग्रंथ सुद्धा "वचन साहीत्य" म्हणजे पुस्तक आहे.

बसवेश्वर यांची वचने छापील रूपात आणण्यासाठी कर्नाटकमधील हळकटटी नावाच्या माणसाने स्वतःचे  घर विकून टाकले व रस्त्यावर राहायला लागला.

!! पुस्तक  कोणते वाचावे?? !!

काही लोक ईश्वराला  मानणारी आहेत, ती आस्तिकवादी पुस्तक  वाचतात.
काही नास्तिक आहे, ती नास्तिकवादी पुस्तके  वाचतात.
पण मला वाटते आपण आस्तिकवादीही वाचू नये व नास्तिक वादीही वाचू नये तर आपण
जगण्याला उपयुक्त ठरतील
अशी वास्तववादी पुस्तके वाचावीत.

1 3- कोणत्याही एका विषयाची पुस्तक जमा करून दहा वर्ष त्यावर चिंतन करा, अकराव्या वर्षी तुमची गणना एका विद्वानात केली जाईल.

14- ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट, त्याचे घर होईल भूईसपाट 

15- पुस्तकाने अशक्त मस्तक सशक्त  होते व सशक्त मस्तक कोणासमोर डोळे झाकून  नतमस्तक होत नाही 

16- आपण गेल्यावर लोकांनी आपणाला विसरू नये असे वाटत असेल तर दोनपैकी एक काम करा 

एक लिहिण्यासारखे काहीतरी काम करा किंवा वाचण्यासारखे काहीतरी लिखाण करा...
      
    धन्यवाद !!

Sunday, 20 March 2016

20 मार्च 1927 चवदार तळ्याचा सत्याग्रह

निसर्गाच्या नियमाप्रमाणे पाणी हे आग विजवते पण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्या महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्यालाच आग लावली
20 मार्च 1927 चवदार तळ्याचा सत्याग्रह क्रांतीदिन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Sunday, 13 March 2016

प्रत्येक युवकाने वाचावा असा संदेश

��प्रत्येक युवकाने वाचावा असा संदेश ��

"कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा, कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,
आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही "

नशिबाला भाव देण्यापेक्षा.....कर्तृत्वाला वाव दिल्यास .....
दिर्घ यशाची नाव...
तुम्हाला जीवनरूपी,सागरात प्रवास करताना दिसेल"

" आळशी दुबळे लोक नेहमी नशिबाची भाषा बोलतात... तर
कर्तृत्ववान माणसं नेहमी प्रयत्नांची शिकस्त करून यशाची उंच शिखरे गाठतात"

" ज्या वेळेस एखादी व्यक्ती असे म्हणतेकी," मी नशिबवान आहे "
त्य वेळेस त्याचा अर्थ असा होतो की, " ती व्यक्ती कर्तृत्ववान नाही"

" नशिबाची गुलामी करण्यापेक्षा प्रयत्नांची शर्यत करून कर्तृत्वाचा झेंडा फडकवा,
त्यातच जगाचा चेहरा मोहरा बदलण्याची पात्रता आहे. भ्रामक नशिबात नाही "

कर्तृत्ववान माणसे कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत...आणि
नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधी कर्तृत्ववान होउ शकत नाही ....."

" नशिबात असेल तर मिळेल असे म्हणत राहू नका .....
आयुष्यात नशिबाचा भाग ०% आणि परिश्रमाचा भाग १०० % असतो.
" नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा !
यश तुमची वाट पाहात आहे "
दिनकर बिरादार मांजरीकर. मो. न. 9890106571

Tuesday, 8 March 2016

पहिल्या भारतातील महिला

महिला दिनाच्या सर्व कन्या , माता भगिनिंना हार्दीक शुभेच्छा !! !

����������������������

पहिल्या भारतातील महिला

������������कर्तृत्व गाथा������������

01. इंदिरा गांधी
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला

02. विजयालक्ष्मी पंडीत
संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954)

03.  सी. बी. मुथम्मा
पहिली महिला राजदूत

04 . सरोजिनी नायडू
पहिली महिला राज्यपाल. (उत्तरप्रदेश)

05. सुचेता कृपलानी
पहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)

06. राजकुमारी अमृत कौर
पहिली महिला केंद्रीय मंत्री

07 . सुलोचना मोदी
पहिली भारतीय महिला महापौर

08. सावित्रीबाई फुले
पहिली महिला शिक्षक - मुख्याध्यापिका

09. फातिमाबिबी मिरासाहेब
भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधिश (1989)

10. कार्नेलिया सोराबजी
पहिली भारतीय महिला बॅरिस्टर

11 . हंसाबेन मेहता
भारतातील पहिली महिला  उपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे 1949)

12. मदर टेरेसा
नोबेल  पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979)

13. अरूंधती रॉय
बुकर पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1997)

14. भानू अथय्या
ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला

15. मंजुळा पद्मनाभन
पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर (1982)

16.  डॉ. आनंदी गोपाळ जोशीविदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर

17. कमला सोहोनीकेंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ

18.  किरण बेदी
पहिली भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी (1972)

19 . कल्पना चावलाअंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997)

20 . बच्चेंद्री पाल
एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक (1984)

21. संतोष यादव
दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक

22 . करनाम मल्लेश्वरी
ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल

23 . आरती साहा
इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू

24 . कॅप्टन चंद्रा
पॅराशूटमधून उडी घेणारी पहिली भारतीय महिला

25. संगीता गुजून सक्सेना
युद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी पहिली भारतीय महिला फ्लाईंग ऑफिसर

26. उज्ज्वला पाटील-धर
शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला 

27. डॉ. अदिती पंत
अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ

28 . सुरेखा यादव-भोसले
आशियातील पहिली भारतीय महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर
29. देविकाराणी रौरिच
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला (1969)

30. रिटा फारिया
पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966)

31 . सुष्मिता सेन
पहिली भारतीय मिस युनिव्हर्स (1994)

32 . डॉ. इंदिरा हिंदुजा
टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी पहिली भारतीय डॉक्टर

33 . इंदिरा चावडा
भारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी

34. शीतल महाजन
पॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी पहिली भारतीय महिला

Sunday, 6 March 2016

एक प्लास्टिक ची कँरी बँग तयार करायला

एक प्लास्टिक ची कँरी बँग तयार करायला 0.14 सेकंड लागतात, आणि ती नष्ट करायला 14,000 वर्षे. एकदा वापरून फेकलेल्या बँग वर धुळ माती बसून ज़र ती जमिनीखाली दाबली गेली तर वरून पडलेले पाणी हजारो वर्ष ती जमिनीत झीरपू देत नाही आणि तेथील जमीन नापिक होते. तर विचार करा , आपण सगळे दिवसातून किती कँरी बाग्स वापरतो, आणि किती पर्यावरणाचे / निसर्गाचे नुकसान करतोय. खरच कँरी बँगची आवश्यकता आहे का ? फ़क्त एक गोष्ट करा, कायम घराबाहेर जाताना आपल्या ऑफिस बँग/ गाडीच्या डिकीत / खिशात / पर्स मध्ये एक कापडी पिशवी ठेवा, आणि बघा आपल्याला कँरी बँगची आवश्यकता भासणार नाही. भारत देश  तुमचा सदैव ऋणी राहील.

कृपया आपल्या सर्व गुप मधे शेअर करा.