Monday, 29 February 2016

वाचनामुळे माणूस कसा घडतो याचं सर्वोत्तम

वाचनामुळे माणूस कसा घडतो याचं सर्वोत्तम उदाहरणांन पैकी एक उदाहरण म्हणजे
"नागराज मंजुळे" (अभिनेता आणि दिग्दर्शक)
"सोलापुरच्या करमाळा गावचा वडार समाजाचा मुलगा..ज्याला ७ वीच्या आतच दारू प्यायची सवय लागली..नंतर गांजा,बिड्या ओढणे..अश्लील चित्रपट पाहणे..पुर्णतः वाया गेलेला..७ वीत असताना ६वीतील एक मुलगी आवडायला लागली..त्याचा नालायकपणा मूलीला कळेल म्हणुन घाबरू लागला..विचार बदलू लागले..१०वीत नापास झाला..रिकामा वेळच वेळ..वाचनाचा नाद लागला..मिळेल ते पुस्तक .कोणा एकाकडुन मृत्युंजय हाती लागलं त्याच्या कडुन कळालं अशी पुस्तके लायब्ररीत मिळतात.तेव्हा गावची लायब्ररी गाठली..सगळी पुस्तके वाचुन काढली..विचारांचा वेग वाढला..स्वतः ची तुलना सुरू झाली..अगदी रामायण महाभारतातल्या राक्षसापर्यंत.. बदलाची गरज तीव्रतेने जाणवू लागली..शिक्षण सुरु झाले..पोलीस भरतीस प्रयत्न.. संघात प्रवेश.. नंतर शिवसेनेत प्रवेश.. अनेक दंगलीत सहभाग.. फुले शाहु आंबेडकर साठे शंकर पाटील यांची पुस्तके वाचायला लागल्यावर पुन्हा वैचारिक बदल.. घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याकरिता वडीलांशी वादविवाद.. भूतकाळातील व वर्तमानातील संदर्भ उदाहरणे देऊन वडीलांना आंबेडकर समजावून सांगितले.. M.A मराठी साहित्य पुर्ण..पुढे communication studies ची master degree पुर्ण..कविता लिहू लागला..एक शाँर्ट फिल्म बनवली..नंतर एक सिनेमा बनवला..दिग्दर्शक बनला..अजुनही प्रवास सूरूच आहे...
मी एवढं सगळं ज्या व्यक्तीबद्दल लिहले ..ती व्यक्ति म्हणजे "६१ वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट फँड्री" चे दिग्दर्शक "नागराज मंजुळे" भविष्यात कुणीतरी मोठं माणुस बनण्यासाठी आपलाही भूतकाळ असाच असावा असे अपेक्षीत नाही.
"लहानपणी कसे होतो यावरून भविष्याचा अंदाज बांधु नका, बदलाला वाव दिला पाहिजे.. माणुस कधीही बदलू शकतो.. फक्त स्वतः वरच्या विश्वासाला जिवंत ठेवलं पाहिजे"
"वाचाल तर वाचाल"
"पुस्तकाने मस्तक सुधारत आणि जे मस्तक सुधारलेल असत ते कोणा पुढे ही नथमस्तक होत नाही."

Wednesday, 24 February 2016

संपादित ग्रंथ -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान

                    
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त

संपादित ग्रंथ
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान”
-------------------------------------------------------------------
                                   दिनांक:- १८/०२/२०१६
प्रति,
प्रा. डॉ. ................................................................
...........................................................................
...........................................................................

आदरणीय सर/मँडम 
      आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, शैक्षणिक वर्ष २०१५-१६ हे संपूर्ण भारतभर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष’ म्हणुन साजरे केल्या जात आहे. या निमित्ताने या महामानवाला आदरांजली देण्याच्या दृष्टीने अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव च्या वतीने दि. १४ एप्रिल २०१६ रोजी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान” या शीर्षकावर ISBN क्रमांक असलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित खालील विषयांवर शोधनिबंध मागविण्यात येत आहेत.
विषय
1)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार
2)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार
3)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार
4)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्युत प्रकल्प व जलनियोजनासंबंधी विचार
5)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब नियोजन विषयी विचार
6)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पत्रकारिता
7)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक आणि उद्योग विषयक विचार
8)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला विषयक विचार
9)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध, हिंदू आणि मुस्लीम आणि इतर धर्म विषयक विचार
10) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान
11) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर  
12) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा दलित, मुस्लीम साहित्यावरील प्रभाव  
13) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध तत्वज्ञान
14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवी हक्कासंबंधीचे विचार
15) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जातीप्रथा निर्मुलनासंबंधीचे विचार
तरी सर्व ज्ञानशाखांच्या (आंतरविद्याशाखीय) प्राध्यापक, संशोधक विदयार्थी व अभ्यासकांनी आपले शोध निबंध दिनांक ३१ मार्च २०१६ पर्यंत atharvapublications@gmail.com किंवा rahulkhandare39@yahoo.in या ई-मेल वर पाठवावेत.
शोध निबंध लिखाणासाठी सूचना
संशोधकांनी संशोधन पेपर मराठीमध्ये Pagemaker किंवा MS-Word मध्ये, DVBTT Surekh, Font Size 14, Line Space 1 मध्ये पाठवावेत. तसेच इंग्रजी भाषेतील संशोधन लेखांसाठी MS-Word मध्ये, Times New Roman, Font Size 12, Line Space 1 चा वापर करावा. तसेच संशोधन लेखाच्या शिर्षकानंतर आपले पूर्ण नाव, पदनाम, महाविद्यालयाचे नाव, पिन कोड, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच ई-मेल लिहावा.  
शोध निबंध प्रकाशन व वितरण शुल्क रु. ५००/- (टपाल खर्चासहित)
नोंदणी शुल्क खालील बँक खात्यात जमा करावेत.
१)     खाते नाव – Atharva Publications          २) खाते क्रमांक - 60185773629
३)     बँकेचे नाव – Bank of Maharashtra        ४) Branch – M.J. College, Jalgaon
५) IFSC Code – MAHB0001161            ६) MICR Code - 425014141  
खात्यात जमा केलेल्या रकमेच्या चलनाची प्रत वर दिलेल्या ई-मेल वर स्कँन करून पाठवावी. एकापेक्षा जास्त लेखकांनी संशोधन लेख लिहिलेला असल्यास प्रत्येक लेखकास प्रकाशन शुल्क भरणे बंधनकारक आहे.

टीप:- संपादित केलेल्या ग्रंथामधील लेख ए. पी. आय. मधील गुणासाठी गृहीत आहेत.
  
प्रकाशक
श्री. युवराज माळी,
संचालक,
अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव.
(९७६४६९४७९७, ०२५७२२३९६६६)
संपादक
प्रा. राहुल खंडारे (९९७०७२२८०३)
प्रा. विनोद रामटेके (९४२३४२४४१९)
प्रा. साईनाथ उमरीवाड (९३७३३१७६६७)



Saturday, 13 February 2016

एक कविता

काल राती राजा अघटित झालं।
महापुरुषांनी साऱ्या आंदोलन केलं।

त्यांचा मोर्चा अचानक आला माह्या दारावर।
भगतसिंगानं बंदुक ठेवली माह्या कानावर।।
आमचे पुतळे उभारणं आता बंद करा म्हणे।
आमचे विचार निदान पुढच्या पीढित पेरा म्हणे।।

शिवबांनी जगदंबा तलवार, दिली माहया हातात।
फाड म्हणे विशिष्ट रंगाचे कपडे, आम्हाला गुंढाळलं ज्याच्यात।।
म्हणे त्या विशिष्ट रंगात श्वास आमचा कोंडतो।
जेव्हा जाती-धर्माच्या नावाखाली माणूस माणसात भांडतो।।

रागारागातच मग सावित्रीबाईंनी दिली दस्तक।
हिस्कावला माह्या अँड्रॉइड अन् दिलं इतिहासाचं पुस्तक।।
माह्या लेकिलेबि आता पाठव म्हणे शाळत।
नाहीतर तुही अब्रु म्हणे वेशिवर ठेविल वाळत।।

बाबासाहेबांनाही भलताच आला होता राग।
म्हणे याच साठी केला कारे आम्ही सर्वस्वाचा त्याग।।
विज्ञानाचं युग थोड़ी ज्ञानाची कास धरा।
अन् घोषणा नको तर घटना वाचून माह नाव मोठं करा।।
द्वेषनिद्रेतून जगाला साऱ्या कर म्हणे जागं।
तरच राजा आमचं आंदोलन आम्ही घेऊ मागं।।

NMIMS Shirpur, Library and Information Science International Conference - June 2016

IAS Struggle Story

Ramesh Gholap IAS

स्पर्धापरीक्षेच्या क्षेत्रातील अनेक गैरसमज मोडीत काढून यश आपल्या जवळ आले आहे ही भावना निर्माण करणारा एक संघर्षमय जीवनप्रवास...

रमेश गोरख घोलप. IAS

*जन्मस्थळः महागांव, ताःबार्शी.(सोलापूर)
*जन्मतारीखः ३० एप्रिल,१९८८.
*आई- अशिक्षित आणि घरोघरी जाऊन बांगड्या भरण्याचा व्यवसाय.
*वडीलः रमेश १२ वीत शिकत असताना निधन.
*प्राथमिक शिक्षण- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महागांव.
*माध्यमिक शिक्षणः संत सावता माळी विद्यालय, अरण. (१०वी-८४.४०%)-२००३.
*महाविद्यालयीन शिक्षणः श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी. (१२ वी सायन्स शाखा -८८.५०%)-२००५
*डिप्लोमा शिक्षण(D.Ed): शं. निं. डी. एड्. कॉलेज, बार्शी.(२००९).
*पदवीचे शिक्षणः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.(विषय-इतिहास)-२०१०.
*नोकरी-(२००९-१० )- सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात बावी येथे जि.प. शाळेत शिक्षकाची नोकरी.
*सप्टेंबर २००९ साली स्पर्धापरीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात.
*२०१० साली- यू.पी.एस.सी. त अपयश आणि त्याच वर्षी महागांव येथील ग्रामपंचायत निवडणूकीत आईचा पराभव.
*२०११ सालच्या यू.पी.एस.सी. परीक्षेतून आय.ए.एस. पदी निवड.(निकाल ४ मे,२०१२)
*२०११ साली दिलेल्या परीक्षेत महाराष्ट्रात एम.पी.एस.सी. परीक्षेत महाराष्ट्रात विक्रमी गुणांनी प्रथम.(निकाल-३० जून २०१२).

*सध्या झारखंड राज्यामध्ये खूंटी जिल्ह्यात एस.डी.एम. या पदावरती कार्यरत...

**निकालाची वैशिष्ट्ये-
१) कोणताही क्लास लावला नाही. फक्त मुलाखतीसाठी क्लासचा उपयोग.
(आय.ए.एस. होण्यासाठी क्लास लावावाच लागतो या समजूतीला फाटा दिला)

२)दोन वर्षे इतक्या अल्प कालावधीत यश.
(स्पर्धापरीक्षेत यशासाठी ५ वर्षे तरी अभ्यास करावा लागतो ही गैरसमज दूर केला.)

३) सरकारी शाळेतून शिक्षण.
(आय.ए.एस. होण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकावे लागते हा समज मोडून काढला)

४) आई अशिक्षित व बांगड्या भरण्याचा व्यवसाय. वडीलांचे १२ वीत असताना निधन-
(अधिकारी होण्यासाठी खूप श्रीमंत आणि सुशिक्षित घरात जन्म व्हावा लागतो हे चुकीचे मत.खोडून काढले)

५). मुक्त विद्यापीठातील पदवीधर- अधिकारी होण्यासाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये नामांकित महाविद्यालयांत शिकावे लागते हे मत बदलायला भाग पाडले.

६)आयुष्यात प्रथम दिल्लीला मुलाखतीसाठीच गेले- तयारीसाठी दिल्लीला जावेच लागते हा गैरसमज खोडून काढला.

७)एकाच वर्षी आय.ए.एस. व त्याच वर्षी एम.पी.एस.सी. मध्ये प्रथम क्रमांक येण्याची पहिलीच वेळ-नियोजनबद्ध अभ्यास केल्यास एकावेळी दोन्ही परीक्षेत यश मिळविणे शक्य आहे हे दाखवून दिले.

८)एम.पी.एस.सी. च्या निकाला आधी आत्मविश्वासाने मी महाराष्ट्रात प्रथम येईल म्हणून आत्मविश्वासाने सांगणारा विद्यार्थी- 'नशिबात असल्याशिवाय मिळत नाही' हे म्हणणे चुकीचे ठरवून स्पर्धा परीक्षा हा नशिबाचा नव्हे तर प्रयत्नांचा डाव आहे हे दाखवून दिले.

जर रमेश घोलप करू शकतात, तर मी का नाही ? हा प्रश्न मनाला नक्की विचारा...
कोणतीही गोष्ट अशक्य नाही..फक्त निर्धारपूर्वक योग्य दिशेने होणारे प्रामाणिक कष्ट महत्वाचे आहेत...

"कुछ किए बिना जयजयकार नहीं होती।
कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती।

========================
        ©मराठी शाळेचे शिलेदार©
        मराठी शाळा टिकल्याच् पाहिजे!!!!
========================