Friday, 29 April 2016

पुस्तके पुस्तके स्वप्नात येतात आणि विचारतात, 'तू आम्हास ओळखले कां?'

पुस्तके
पुस्तके  स्वप्नात येतात आणि विचारतात,
'तू आम्हास ओळखले कां?'

बोलता बोलता पुस्तके वितळतात
आणि अथांग पाणी होऊन हेलावत विचारतात
'तू आमच्यात कधी न्हालास कां? पोहलास कां?'

पुस्तके मग घनदाट वृक्ष होतात
आणि विचारात ,
'आमची फळे खाल्लीस कां
छायेत कधी विसावलास कां?'

पुस्तके भुरुभुरु वाहणारा वारा होतात
नि विचारात ,
'श्वासाबरोबर आम्हाला कधी उरात साठवलेस कां?'

पुस्तके असेच काही विचारीत राहतात
एकामागून एक.

प्रत्येक प्रश्नाला माझे काही उत्तर नसते;
मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहत.

तेव्हा पुस्तके सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात
नि म्हणतात ,
'म्हणजे आमचे आयुष्य व्यर्थच ना?'

पुस्तके मूक होतात,
झुरत जातात,
स्वतःला वाळवीच्या स्वाधीन करतात,
शेवटी आत्महत्या करतात ती-
घरातल्या घरात,
बंद कपाटाच्या कारागृहात...

एक अच्छी पुस्तक हज़ार दोस्तों के बराबर होती है जबकि एक अच्छा दोस्त एक लाइब्रेरी (पुस्तकालय)  के बराबर होता है

        - डॉ.अब्दुल कलाम��
वाचाल तर वाचाल
आज जागतिक पुस्तक दिन

Friday, 22 April 2016

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक महत्त्वाचे दिनविशेष

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक महत्त्वाचे दिनविशेष

     आंतरराष्ट्रीय दिनविशेष -

जागतिक हास्यदिन - 10 जानेवारी
 जागतिक सीमाशुल्क दिन - 26 जानेवारी
 जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन - 30 जानेवारी
 जागतिक पाणथळ/विवाह दिन - 4 फेब्रुवारी
 जागतिक कर्करोग दिन - 4 फेबु्रवारी
 जागतिक रूग्ण हक्क दिन - 11 फेब्रुवारी
 जागतिक प्रेम दिन - 14 फेब्रुवारी
 जागतिक सामाजिक स्वच्छता दिन - 20 फेबु्रवारी
 जागतिक सामाजिक न्याय दिन - 20 फेबु्रवारी
 जागतिक मातृभाषा दिन - 21 फेब्रुवारी
 जागतिक महिला दिन - 8 मार्च
 जागतिक ग्राहक दिन - 15 मार्च
 जागतिक अपंग दिन - 17 मार्च
 जागतिक चिमणी दिन - 20 मार्च
 जागतिक वन दिन - 21 मार्च
 जागतिक जल दिन - 22 मार्च
 जागतिक हवामान दिन - 23 मार्च
 जागतिक क्षयरोग दिन - 24 मार्च
 जागतिक रंगभूमी दिन - 27 मार्च
 जागतिक आरोग्य दिन - 7 एप्रिल
 जागतिक होमीओपॅथी दिन - 10 एप्रिल
जागतिक ज्ञान दिन - 14 एप्रिल  ( डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती )

 जागतिक वारसा दिन - 18 एप्रिल
 जागतिक वसुंधरा दिन - 22 एप्रिल
 जागतिक पुस्तक दिन - 23 एप्रिल
 जागतिक कॉपीराईट दिन - 23 एप्रिल
 जागतिक बौद्धीक संपदा दिन - 26 एप्रिल
 जागतिक कामगार दिन - 1 मे
 जागतिक सौरदिन - 3 मे
 जागतिक रेडक्रॉस दिन - 8 मे
 जागतिक कुटुंब दिन - 15 मे
 जागतिक दूरसंचार दिन - 17 मे
 जागतिक दहशतवाद विरोधी दिन - 21 मे
 जागतिक राष्ट्रकुल दिन - 24 मे
 जागतिक तंबाखूविरोधी दिन - 31 मे
 जागतिक दूध दिन - 1 जून
 जागतिक पर्यावरण दिन - 5 जून
 जागतिक बालरक्षक दिन - 6 जून
 जागतिक बालकामगार मुक्ती दिन - 12 जून
 जागतिक रक्तदान दिन - 14 जून
 जागतिक योग दिन - 21 जून
 जागतिक ऑलिम्पिक दिन - 23 जून
 जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन - 26 जून
 जागतिक लोकसंख्या दिन - 11 जूलै
 जागतिक नेल्सन मंडेला दिन - 18 जूलै
 जागतिक वनसंवर्धन दिन - 23 जूलै
 जागतिक हिरोसिमा दिन - 6 ऑगस्ट
 जागतिक विश्‍वशांती दिन - 6 ऑगस्ट
 जागतिक नागसाकी दिन - 9 ऑगस्ट
 जागतिक युवक दिन - 12 ऑगस्ट
 जागतिक जेष्ठ नागरिक दिन - 21 ऑगस्ट
 जागतिक नारळ दिन - 2 सप्टेंबर
 जागतिक साक्षरता दिन - 8 सप्टेंबर
 जागतिक अभियंता दिन - 15 सप्टेंबर
 जागतिक लोकशाही दिन - 15 सप्टेंबर
 जागतिक ओझोन दिन - 16 सप्टेंबर
 जागतिक शांतता दिन - 21 सप्टेंबर
 जागतिक पर्यटन दिन - 27 सप्टेंबर
 जागतिक हृदयरोग दिन - 30 सप्टेंबर
 जागतिक वृद्ध दिन - 1 ऑक्टोंबर
 जागतिक अहिंसा दिन - 2 ऑक्टोंबर
 •जागतिक शिक्षण दिन - 5 ऑक्टोंबर
 जागतिक टपाल कार्यालय दिन - 9 ऑक्टोंबर
 जागतिक मानसिक आरोग्य दिन - 10 ऑक्टोंबर
 जागतिक अंध दिन - 15 ऑक्टोंबर
 जागतिक विद्यार्थी दिन - 15 ऑक्टोंबर
 जागतिक अन्न दिन - 16 ऑक्टोंबर
 जागतिक दारिद्र निर्मुलन दिन - 17 ऑक्टोबर
 जागतिक आयोडिन कमतरता दिन - 21 ऑक्टोबर
 जागतिक युनो दिन - 24 ऑक्टोबर
 जागतिक इंटरनेट दिन - 29 ऑक्टोबर
 जागतिक युनेस्को दिन - 4 नोव्हेंबर
 जागतिक विज्ञान दिन - 10 नोव्हेंबर
 जागतिक मलाला दिन - 10 नोव्हेंबर
 जागतिक शौचालय दिन - 19 नोव्हेंबर
 जागतिक पर्यावरण संवर्धन दिन - 25 नोव्हेंबर
 जागतिक एड्स दिन - 1 डिसेंबर
 जागतिक संगणक साक्षरता दिन - 2 डिसेंबर
 जागतिक अपंग दिन - 3 डिसेंबर
 जागतिक मानवी हक्क दिन - 10 डिसेंबर
 जागतिक युनिसेफ दिन - 11 डिसेंबर
 जागतिक जैवविविधता दिन - 29 डिसेंबर

राष्ट्रीय दिनविशेष -
 राष्ट्रीय प्रवासी दिन - 9 जानेवारी
 राष्ट्रीय युवक दिन - 12 जानेवारी (स्वामी विवेकानंद जयंती)
 राष्ट्रीय भूदल दिवस - 15 जानेवारी
 राष्ट्रीय भुगोल दिन - 15 जानेवारी
 राष्ट्रीय बालिका दिन - 24 जानेवारी
 राष्ट्रीय पर्यटन दिन - 25 जानेवारी
 राष्ट्रीय मतदार दिन - 25 जानेवारी
 राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन - 26 जानेवारी
 राष्ट्रीय हुतात्मा दिन - 30 जानेवारी
 राष्ट्रीय विज्ञान दिन - 28 फेबु्रवारी(सी.व्ही.रमन जन्म)
 राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन - 29 फेबु्रवारी
 राष्ट्रीय संरक्षण दिन - 3 मार्च
राष्ट्रीय वकिल दिन-14 एप्रिल  ( डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती )
 राष्ट्रीय टपाल दिन - 10 ऑक्टोबर
 राष्ट्रीय ऐक्य दिन - 20 ऑक्टोबर
 राष्ट्रीय एकात्मता दिन - 31 ऑक्टोबर (इंदिरा गांधी स्मृतीदिन)
 राष्ट्रीय एकता दिन - 31 ऑक्टोबर (वल्लभभाई पटेल जयंती)
 राष्ट्रीय शिक्षण दिन - 11 नोव्हेंबर (मो. आझाद जयंती)
 राष्ट्रीय पक्षी दिन - 12 नोव्हेंबर
 राष्ट्रीय बालकदिन - 14 नोव्हेंबर
 राष्ट्रीय नौदल दिन - 4 डिसेंबर
 राष्ट्रीय ध्वज दिन - 7 डिसेंबर
 राष्ट्रीय पत्रकार दिन - 16 डिसेंबर
 •राष्ट्रीय गणित दिन - 22 डिसेंबर
 राष्ट्रीय किसान दिन - 23 डिसेंबर (चौधरी चरणसिंग जयंती)
 राष्ट्रीय ग्राहक दिन - 24 डिसेंबर
 राष्ट्रीय सुरक्षा दिन - 4 मार्च
 राष्ट्रीय नागरी सेना दिन - 21 एप्रिल
 राष्ट्रीय पंचायतराज दिन - 24 एप्रिल
 राष्ट्रीय मानव एकता दिन - 24 एप्रिल
 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन - 11 मे
 राष्ट्रीय माऊंट एव्हरेस्ट दिन - 29 मे
 राष्ट्रीय दृष्टिदान दिन - 10 जून
 राष्ट्रीय सांख्यीकी दिन - 29 जून(पी.सी.महालनोबीस जन्मदिन)
 राष्ट्रीय कारगील दिन - 26 जूलै
 राष्ट्रीय संस्कृत दिन - 8 ऑगस्ट
 राष्ट्रीय सदभावना दिन - 20 ऑगस्ट
 राष्ट्रीय अक्षयउर्जा दिन - 20 ऑगस्ट
 राष्ट्रीय क्रिडा दिन - 29 ऑगस्ट (मे.ध्यानचंद जन्मदिवस)
 राष्ट्रीय शिक्षक दिन - 5 सप्टेंबर (डॉ. राधाकृष्णन जयंती)
 राष्ट्रीय हिंदी दिन - 14 सप्टेंबर
 राष्ट्रीय ऐच्छीक रक्तदान दिन - 1 ऑक्टोबर
 • राष्ट्रीय हवाईदल दिन - 8 ऑक्टोबर
 

     प्रादेशिक दिनविशेष -

बालिका  दिन - 3 जानेवारी (सावित्रीबाई फुले जयंती)
 पत्रकार दिन - 6 जानेवारी (बाळशास्त्री जांभेकर स्मृतीदिन)
 सिंचन दिन - 26 फेब्रुवारी (शंकरराव चव्हाण स्मृतीदिन)
 मराठी भाषा दिन - 27 फेब्रुवारी (कुसूमाग्रज जयंती)
 समता दिन - 12 मार्च (यशवंतराव चव्हाण)
 उद्योग दिन - 10 मार्च (किर्लोस्कर स्मृती)
 शिक्षण हक्क दिन - 11 एप्रिल (म. फुले जयंती)
वकिल दिन - 14 एप्रिल ( डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती )
 महाराष्ट्र दिन - 1 मे
 सामाजिक न्याय दिन - 26 जून (शाहू महाराज जयंती)
 कृषी दिन - 1 जूलै (वसंतराव नाईक जयंती)
 शेतकरी दिन - 29 ऑगस्ट (विठ्ठलराव विखेपाटील स्मृती)
 श्रमप्रतिष्ठा दिन - 22 सप्टेंबर (कर्मवीर भाऊराव पाटील स्मरणार्थ)
 राज्य माहिती अधिकार दिन - 28 सप्टेंबर
 रंगभूमी दिन - 5 नोव्हेंबर (विष्णूदास भावे जयंती)
 जैवतंत्रज्ञान दिन - 14 नोव्हेंबर
 हुंडाबळी दिन - 26 नोव्हेंबर

23 एप्रिल.... जागतिक पुस्तक दिन...

23 एप्रिल....
जागतिक पुस्तक दिन...

पुस्तकाचे महत्त्व सांगणारी काही वाक्ये...

��शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, तर वाचनाने सुसंस्कृत.

��ग्रंथ हे आयुष्यातील खरे सोबती होत.

��माणसाला सुसंस्कृत, बहुश्रुत करण्यात पुस्तकांचा खूप उपयोग होतो.

��माणूस माणसाचा वैरी होऊ शकतो, पण पुस्तके मात्र अखंड मैत्रीच करतात.

��समाजशिक्षणाचा पाया म्हणजे ग्रंथालय होय.

��पुस्तकांची मैत्री म्हणजे विचारांची आराधना.

��वाचनामुळे शरीराला व मनाला आलेला शीण जातो.

��सुसंस्कृतपणाचा वारसा ग्रंथालयाकडून समाजाला मिळत असतो.

��ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे हाती,
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या रात्री.

��When you read a book, recommend it to your friends.

��जगाची ओळख आणि बहुश्रुतपणा हाच वाचनाचा खरा उद्देश.

��आयुष्याचं सोनं करण्याचं सामर्थ्य पुस्तकात आहे.

����������������
पुस्तकातील ज्ञान ही अशी शिदोरी आहे, जी जीवन जगताना उपयोगी पडते.
����������������
����������������

Tuesday, 19 April 2016

झाडे लावा आणि " निसर्ग मित्र व्हा "

��एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.

��एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.

��एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.

��एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.

��एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.

��एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.

��एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.

��एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.

��एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.

��एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.

��एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.

��एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.

��एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.

������������������

एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.

��आता नाही तर कधीच नाही.

��तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.

��जगातील सर्व पैसा जरी एका केला तरी आपण 6 महिने
पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.

�� मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.

��तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.

��म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.
।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।।

��मित्रांनो आज पासुन आपण शपथ घेऊया कि प्रत्येकाने 1 किंवा 2 झाड लावायलाच पाहीजेत.

�� मिशन ग्रीन इंडिया मध्ये सामिल व्हा आणि पृथ्वीला वाचवा.

एक किंवा दोन झाडे लावा आणि
" निसर्ग मित्र व्हा "
����������������

Wednesday, 13 April 2016

नाही म्हणणार, भारतमाता की जय

प्रत्येक मोबाईलवर हा लेख गेला पाहिजे. -

" नाही म्हणणार, भारतमाता की जय "
~~~~~~~~~~~~~~~~~~~

- संजय पवार
(दैनिक पुण्यनगरी)

    अजिबात इच्छा नसताना हा विषय लिहावा लागतोय , कारण स्वातंञ्यानंतर गेली ६० वर्षे हा प्रश्न कधीस उद्भवलाच नाही .' वंदे मातरम् ' म्हणणार नाहीवाली बनातवालांची पिढी गेली आणि त्यांना दम देणाऱ्या मोठ्या ठाकरेंची पिढीही गेली ; पण विकासाचा मुखवटा लावून गोंडस भासणारे मुख्यमंत्री पक्षाच्या अधिवेशनात स्वतःचा भेसूर चेहरा दाखवतात , तेव्हा समाचार घ्यावाच लागणार .
  भारतमाता की जय बोलणार नाहीत , त्यांना या देशात रहायचा अधिकार नाही ! हे कोण बोलतंय? संघस्थानावर वाढलेले आणि त्यांच्याच राजकीय फळीत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आणि सद्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस .
    हे कोण भारत माता की जय म्हणा सांगणारे ? इंग्रजांशी लढून , सनदशीर मार्गाने , अहिंसक क्रांती करुन ( काही क्रांतिवीरांच्या सशश्र क्रांतीसह ) स्वराज्य मिळविले.१९४७ साली तिरंगा फडकवला , तेव्हा हे सगळे अर्ध्या चड्ड्या घालून , स्वतंञ आंदोलनाकडे पाठ फिरवून आणि हिटलरकडे तोंड करुन हिंदू राष्ट्रासाठी कवायत करत होते. जी काही तथाकथित ' भारतमाता ' हे सांगतात , तिची मुक्तता करताना हे नव्हतेच ! आणि आता ही अरेरावी ?

    त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रासाठी आंदोलन झाले. मुंबईचा शेतकरी , कामगार यात प्राणपणाने लढला, स्वकियांच्या गोळ्या खाल्ल्या ; पण मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव उधळला , तेव्हाही हे कुठेच नव्हते आणि आता त्याच मुंबईत , विधानसभेत सांगता , भारतमाता की जय  म्हणा ?
कुठल्या अधिकारात ? ना या देशासाठी तुम्ही लढलात , ना महाराष्ट्रासाठी ! तरीही वर ही शिरजोरी ? लोक ऐकून घेताहेत म्हणून वाट्टेल ते बोलत रहाल , वाद वाढवित रहाल , तर एक दिवस त्याचं असं उत्तर मिळेल की , भारत मातेचं दूध आठवेल !

   का म्हणायचं आम्ही भारतमाता की जय ? आणि तुम्ही म्हणता म्हणून तर अजिबात नाही म्हणणार .

तुमचा मनुचा डीएनए आता प्याथॉलॉजी लँबमध्ये न जाताही दिसू लागलाय. महिला मंदिरात प्रवेश करणार म्हणून देव पाण्यात ठेवणारे तुम्ही , तुम्ही भारतमातेबद्दल बोलता ?

स्वतःच्याच आईबहिणींच्या नैसर्गिक स्थितीला विटाळ मानून त्यांना देवदर्शन काय , घराबाहेर चार दिवस बसवणारे तुम्ही , तुम्ही भारतमातेबद्दल बोलता ? 
   तुम्ही स्रीला शिक्षणाचा अधिकार नाकारलात , तिला सती चढवलेत , केशवपन करुन विद्रुप केलेत , पुनर्विवाहास बंदी घालून , घरातल्या घरात तिला नासवलीत , तुमच्या या कर्तृत्वाची ' बाळंतपणं ' फुले दाम्पत्यांनी केली. त्यांनी केशवपनविरोधात न्हाव्यांचा संप घडविला आणि मुलींसाठी शाळाही काढली , हे सगळं होतांना तुम्ही मनुस्मृतीसह , तुमचा वैदिक धर्म , रुढी , परंपरा सांभाळत , सुधारकांवर अश्लाध्य भाषेत बोलत , शेण ,दगड विटांचा मारा करत होतात ! आणि तुम्ही आम्हाला सांगता भारतमाता की जय ?

    जगातील सर्वात अमानुष , राक्षशी प्रथा ' अस्पृश्यता ' तुमच्या धर्माच्या चातुर्वर्णाची देन ! माणसांचा विटाळ धरणारी , त्यांना शूद्र म्हणणारी , त्यांना शिक्षणाचाच काय प्यायच्या पाण्याचाही आधिकार नाकारणारी तुमची संस्कृती आणि धर्म , तरीही वाक्प्रचार काय तयार करता ? तर अस्मानी आणि सुलतानी संकट ! आजही इथल्या दलित , भटक्या विमुक्तांना ज्यांना जन्मजात गुन्हेगार मानले जाते, जे पोलीसी छळाचा बळी ठरतात , त्या सर्वांसाठी तुम्ही काय सुलतानीपेक्षा कमी आहात ? आणि हे सर्व या मातीतले , तुम्ही बाहेरुन आलेले , आजही ' ज्यूं' शी तुलना करणारे तुम्ही , तुम्हाला अधिकारच काय कुणी काय बोलावं हे सांगण्याचा ?
   मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे नेमाडेंच्या कादंबरीतला मोठा मेंदू छोटा आणि छोटा मेंदू मोठा असलेला देशपांडे ! त्याचे प्रमुख सरसंघचालक काहीही बोलतात आणि त्यावर प्रतिक्रिया उमटतात !

भाजपा , अभाविप, वनवासी आश्रम ही सगळी यांचीच आपत्ये; पण वेळ आली की आम्ही वेगळे, आमचे निर्णय आम्ही घेतो ! ..वगैरे गुळमुळीत उत्तरे ! राम मंदिराच्या नावावर विहिंप आडून विद्वेश पसरवणे, पैसा जमवणे असले उद्योग केले! आज राम मंदिर ही प्रायॉरिटी नाही ; पण ते आम्ही बांधणारच! कार्य काय संघाचं ? वनवासी आश्रम ? हे कधी झालं ? जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि बुध्द धर्माची पुनर्स्थापणा केली, तेव्हा यांच्या पायाखालची जमीन सरकली ! तेव्हा त्यांच्या चालीरीती ,देव , नाव बदलून ब्राह्मणी हिंदूकरण केलं ! याला हे सेवा कार्य म्हणतात ! त्यासाठी परदेशी ब्राह्मण नियमित निधी पाठवतात. त्यावर यांचे नवसंस्कारवर्ग चालतात.

      यांचं हिंदुत्व हे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासारखं नाही. मावळ्यांचा राजा , बारा बलुतेदारांचा राजा , कुळवाडी भूषण राजा ..यांनी ' गोब्राह्मण प्रतिपालक ' केला !
म्हणजे शिवाजी महाराज मोगलांशी लढले ते गायी आणि ब्राह्मण वाचवण्यासाठी ! वर पुन्हा हे त्यांना राज्याभिषेक करायला नकार देणार ..आणि आता हे आम्हाला सांगणार ..?

भारतमाता की जय म्हणा नाही तर येथे राहू नका ? किमान बोलण्याआधी आरशात तरी बघायचं ?

     इतके दांभिक, इतके बिनकण्याचे आणि शब्द फिरवणारे लोक जगाच्या पाठीवर कुठे नसतील .उठसूठ बाबासाहेबांचे आणि संविधानाचे नाव घेतात. कोर्टात शपथपञ देतात आणि नंतर मंदिरात जाणाऱ्या महिलांना पोलीसी बळाने हाकलून देतात ?
हे तुमचं बेटी बचाव ,बेटी पढाव ?
हा तुमचा नारी सन्मान  ?

    कसली कुणाची भारतमाता ?
बैल कापला म्हणून माणूस मारता ?
दलित पोरगं लग्नात घोड्यावर बसलं म्हणून झोडपून काढता ?
मंदिर प्रवेश करणाऱ्या बायांवर पोलीस घालता ?
आणि यांच्या नादाला लागून गावच्या बाया या महिलांनाच शिव्याशाप नि मार देतात ?

    गावकरी बायांनो ..म.फुले ,साविञीबाई फुले , शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर नसते तर ..तुम्ही आजही सती गेला असता , तुमचे केस भादरले आसते ; तुम्हाला शिक्षणाचा हक्क नसता !
आज विश्वस्तपदी बसलात ती या महापुरुषांची देन  !
नाही तर तुम्ही या धर्माप्रमाणे  पायातली वहान होता ! माहितीय ? उठता बुक्की बसता लाथ मारायची वस्तू ! पोरं जन्माला घालायचं मशीन !
   आज जे कॅमेरासमोर उभं राहून चुरुचुरु बोलताय ना ..ज्या धर्मासाठी  ..त्या धर्मात तुम्हीसुध्दा महार मांगाच्या लायकीच्या ..होतात !

   देशातलं, राज्यातलं वातावरण ज्या उन्मादानं तापवलं जातंय , ते पाहून कुणाही विवेकी माणसाला यातना ,चीड , संताप , दुःख, हसू आणि आसू या क्रमाणे उद्विग्नता येईल ; पण या तुपकट चेहऱ्याच्या संघवाल्यांना अधिकच चेव चढेल ..कारण काही घडवायचं नाही .माञ सगळं विस्कटून टाकायचं ही आहे संघनीती !

   या निमित्ताने आमच्या विकासाभिमुख मुख्यमंञ्यांना जाहीर आव्हान द्यायचंय.
पंजाबच्या अकाली दलाला आणि काश्मिरच्या पीडीपीला "भारतमाता की जय",म्हणायला लावा, आणि मग आम्हाला इशारे द्या .

लेखक - संजय पवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~

Wednesday, 6 April 2016

स्कोर काय झाला सांगा- शितल साठे (कबीर कला मंच)

स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।
काम नाय हाताला
भाकर नाय पोटाला
तोंड वर करुन काय
इचारतो मला.....???
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला.....।।

युवराजच्या फटक्याला
वाजवतो टाळ्या
अन सचिन च्या शतकाला
फटाक्यांच्या माळा...
प्यान्ट फाटली ढुंगनावर
ठिगाळ नाय त्याला
अन तोंड वर करुन काय
इचारतो मला...??
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।

एका एका जाहिरातीचे
करोडो घेती
तोंड रंगवुन येती
कधी तोंड रंगवुन जाती..
टीवी च्या चैनल वर
सचिन पुन्हा येतो
चुना लावून येतो कधी
चुना लावून जातो..
बूस्ट घ्या बिअर घ्या
दूध मागु नका
पेप्सी घ्या कोला घ्या
पाणी मागु नका...
पिज्जा घ्या बर्गर घ्या
भाकर मागु नका...
थोबाड त्यांच बघुन
फायदा काय तुला
अन तोंड वर करुन काय
इचारतो मला..??
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।

आय पी एल नावाच
आणले नव सॉन्ग
खेळाडूंची झाली विक्री
लाउनि रांग...
काळा पैसा पांढरा करतो
आय पी एल वाला
न अर्थकरण कळणार कधी
आपल्या देशाला...

खेळ कुठे राहिला सारा
बाजार झाला
नी क्रिकेट नावाचा
आजार झाला
या आजारान घेरलया
उभ्या देशाला
अन तोंड वर करुन काय
इचरतो मला...??
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।

मीच आता काही
विचारतो तुला
खरे खरे सांगायचे
स्कोर काय झाला...

बलात्कार झाले कितीे
स्कोर काय झाला...
दंगली मधे मेले कितीे
स्कोर काय झाला...

कामगारांना पिळले कितीे
स्कोर काय झाला...
दलिताना छळले कितीे
स्कोर काय झाला...

बेकारांची गर्दी कितीे
स्कोर काय झाला...
शेतकरी मेली कितीे
स्कोर काय झाला...

स्विस बैंकेत पैसा का
स्कोर काय झाला...
गरिबाना मारले का
स्कोर काय झाला...

बालगुन्हे वाढले कितीे
स्कोर काय झाला...
जंगल जमीन हडपलीे
स्कोर काय झाला...

उभा देश जळतोया
जाण नाही तुला
न तोंड वर करुन काय
इचारतो मला...??
स्कोर काय झाला...
सांगा स्कोर काय झाला
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...

शितल साठे (कबीर कला मंच)

NMU ALL INDIA RANKING-59

NMU ALL INDIA RANKING-59

I am proud to be aibrarian

Yes I'm a librarian..............
Behind that doctor,
Is me, a librarian...........
Behind that economist,
Is me, a librarian..........
Above those astronomers, is me, a librarian..............
I carry the light even though they mostly make jokes of me...........
Behind all those teachers,
Is me, a librarian..........
I don't qualify for a BPL house nor earn enough to buy an expensive one.............
Because I am a librarian........
It doesn't matter how they look at me,
Some think or even say that I don’t have work, and I am spending time with teachers and students, and yes I do. I have to spend the time behind all the teachers and students to know their requirements at their convenience, and keeping my work aside…
Because I am a librarian........
It doesn't matter how they look at me,
Some think or even say that I don’t have work, I spend most of my time on internet, and yes I do. The information getting on their e-mail and providing web2.0 service and maintaining website requires time to spend on internet.
Because I am a librarian........
It doesn't matter how they look at me,
Some think or even say that I don’t have work, I spend most of my time on mobile, and yes I do. The documents required by them is reaching in time by communicating with vendors and reminding journal suppliers to get the same in time and providing instant information as SMS or whatsapp services require mobile usage and it also requires high end mobile, I have to spend money from my pocket to provide up to date information to the users….
Because I am a librarian........
It doesn't matter how they look at me,
Some think or even say that I don’t have work, I spend most of my time with higher authorities and in admin office, and yes I do. The new initiatives in library require meetings to convenience the authorities and to get work done from admin staff requires time.
Because I am a librarian........
It doesn't matter how they look at me,
Students and academicians are enjoying holidays, I am working alone (in office and home, family is also on holidays) regularly and getting stock verified, and evaluating my work during the academic year and planning myself to prepare for the next academic year.
Because I am a librarian.
It doesn't matter how they look at me,
Some think or even say that i don’t have work, i spend most of my time on research and development work, and yes I do. I have to be abreast with new development in the ICT to update myself, teachers and students…
Because I am a librarian........
It doesn't matter how they look at me,
Although I am considered as equal to teachers, I am very much depressed by discrimination by authorities and my own teaching community because I am alone nobody is there to support me .......
Because I am a librarian........
It doesn't matter how they look at me,
Despite all that I am a librarian and I have to support the teaching and learning...
The main source of inspiration is our teacher getting awarded and appreciated for their work and the students are reaching new heights in their life and facing the challenges of the world…

Because I am a librarian........
It doesn't matter how they look at me,
it doesn't matter how much more they earn than me,
it doesn't matter that they drive while I walk, because all what they have is through me, a librarian.. Whether they acknowledge me or not......
I am proud to be a librarian...........

Pass this to all the librarians n make them proud of their career.