23 एप्रिल....
जागतिक पुस्तक दिन...
पुस्तकाचे महत्त्व सांगणारी काही वाक्ये...
शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, तर वाचनाने सुसंस्कृत.
ग्रंथ हे आयुष्यातील खरे सोबती होत.
माणसाला सुसंस्कृत, बहुश्रुत करण्यात पुस्तकांचा खूप उपयोग होतो.
माणूस माणसाचा वैरी होऊ शकतो, पण पुस्तके मात्र अखंड मैत्रीच करतात.
समाजशिक्षणाचा पाया म्हणजे ग्रंथालय होय.
पुस्तकांची मैत्री म्हणजे विचारांची आराधना.
वाचनामुळे शरीराला व मनाला आलेला शीण जातो.
सुसंस्कृतपणाचा वारसा ग्रंथालयाकडून समाजाला मिळत असतो.
ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे हाती,
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या रात्री.
When you read a book, recommend it to your friends.
जगाची ओळख आणि बहुश्रुतपणा हाच वाचनाचा खरा उद्देश.
आयुष्याचं सोनं करण्याचं सामर्थ्य पुस्तकात आहे.
पुस्तकातील ज्ञान ही अशी शिदोरी आहे, जी जीवन जगताना उपयोगी पडते.
No comments:
Post a Comment