Sunday, 13 March 2016

प्रत्येक युवकाने वाचावा असा संदेश

��प्रत्येक युवकाने वाचावा असा संदेश ��

"कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा, कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,
आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही "

नशिबाला भाव देण्यापेक्षा.....कर्तृत्वाला वाव दिल्यास .....
दिर्घ यशाची नाव...
तुम्हाला जीवनरूपी,सागरात प्रवास करताना दिसेल"

" आळशी दुबळे लोक नेहमी नशिबाची भाषा बोलतात... तर
कर्तृत्ववान माणसं नेहमी प्रयत्नांची शिकस्त करून यशाची उंच शिखरे गाठतात"

" ज्या वेळेस एखादी व्यक्ती असे म्हणतेकी," मी नशिबवान आहे "
त्य वेळेस त्याचा अर्थ असा होतो की, " ती व्यक्ती कर्तृत्ववान नाही"

" नशिबाची गुलामी करण्यापेक्षा प्रयत्नांची शर्यत करून कर्तृत्वाचा झेंडा फडकवा,
त्यातच जगाचा चेहरा मोहरा बदलण्याची पात्रता आहे. भ्रामक नशिबात नाही "

कर्तृत्ववान माणसे कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत...आणि
नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधी कर्तृत्ववान होउ शकत नाही ....."

" नशिबात असेल तर मिळेल असे म्हणत राहू नका .....
आयुष्यात नशिबाचा भाग ०% आणि परिश्रमाचा भाग १०० % असतो.
" नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा !
यश तुमची वाट पाहात आहे "
दिनकर बिरादार मांजरीकर. मो. न. 9890106571

No comments:

Post a Comment