Friday, 24 February 2017

शनिच्या दगडावर महागडे लाखो

शनिच्या दगडावर महागडे लाखो लिटर तेल वाया जरी गेले तरी चालेल?
पण हातावरचा चिमुटभर प्रसादाचा कण सुध्दा जमिनीवर पडला नाही पाहिजे.....

दलित आदिवासींची मुलं अन्न पाणी दुधावाचून कुपोषणाने मेली तरी चालेल?
पण शंकराच्या दगडी पिंडींला लाखो लिटर दूधाने आंघोळ घालून धुतलेच पाहिजे.....

रेशनवर गरिबांना तांदूळ नाही भेटले तरी चालेल?
पण लग्न कार्यामध्ये अक्षता म्हणून लाखो टन तांदूळ उधळलेच पाहिजे.....

चपातीला डालडा नसला तरी चालेल?
पण गुजरात मधील मंदिर मध्ये पायाखाली लाखो लिटर घी तुडवलेच पाहिजे.....

मुलांच्या शाळेला फि भरायला पैसा नसेल तरी चालेल?
पण मंदिराच्या दानपेटी मार्फत ब्राह्मणांना करोडो रुपयांचा महिन्याला टनवर्क पोहोचलाच पाहिजे.....

कुंभ मेळयात नागडया साधूंनी धुमाकूळ घातला तरी चालेल?
पण आपल्या शिकलेल्या मुलींना आया बहिणी सुनेला त्या नागडया साधूंचे आशिर्वाद मिळालेच पाहिजे.....

हंडाभर पाण्यासाठी मैलो आया बहिणीची ऊनातानात पायपिट झाली तरी चालेल?
पण देवा धर्माच्या नावाखाली तलाव नद्या दूषित केल्याच पाहिजे.....

शरीर कमजोर झाले तरी चालेल?
पण हप्त्याचे उपवास केलेच पाहिजे....                           
घराच्या चार भिंतीसाठी लाखाचे कर्ज काढले तरी चालेल?                         पण सुखशांतीसाठी सत्यनारायण घातलाच पाहिजे.....

आया बहिणींची अब्रू लुटली गेली तरी चालेल?
पण आपण शांत बसलेच पाहिजे.....

उच्च शिक्षण घेणारया व शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या अभ्यासाचे नुकसान झाले तरी चालेल?
पण लग्न कार्यात सणासुदीला डिजे ढोल ताशे वाजलेच पाहिजे.....

महाग खतबियाणं पाणीपावसाला पारखा होऊन  कर्जबाजारी झालेल्या  शेतकरयाने आत्महत्या केली तरी चालेल?
पण शेतकरीची सतत  फसवणूक करून पंचतारांकित हाॅटेलात जेवणारया त्याच त्याच पक्ष  नेत्यांना सतत निवडून दिलेच पाहिजे.....

म्हातारे कोतारे आजारी पाजारींना तान्हया बाळांना आवाजाचा त्रास झाला तरी चालेल?
पण दिवाळीत प्रदूषित फटाके वाजलेच पाहिजे.....

ट्राफिक जाम होऊन देशाचे नुकसान झाले तरी चालेल?
पण करोडो रुपयाची उधळण करणारे गणेशोत्सवाचे मांडव रस्त्यावर लागलेच पाहिजे
व गरभा झालाच पाहिजे.....

तरूण मुले विविध नशा करून बिघडली तरी चालेल?
पण ऊतसव मिरवणुकीत व विजयी निवडणुकीच्या मिरवणुकी मुले नाचायला पाठवलीच पाहिजे.....

जातीपाती मध्ये विभाजित राहून एकमेकांचे जीव घेतले तरी चालेल?
पण स्वार्थी नेत्यांपुढे व पाखंडी धर्म मारतंडा पुढे झुकलेच पाहिजे.....

बस झाली स्वताचीच फसवणूक करून घेणे व अंधश्रद्धा बागळणे थांबवा हे   आता सर्व जाती धर्माच्या बंधू भगिनींनो  आपण विकृत प्रथांना तिलांजली दिलीच पाहिजे
आता प्राणपणाने लढा उभारलाच पाहिजे.
लढा उभारलाच पाहिजे सक्षम देश उभारणीसाठी
प्रत्येकाने हातभार लावलाच पाहिजे.....✍🏽
--------------------
--------------------
अंधश्रध्दामुक्त परिवार .

No comments:

Post a Comment